शिवस्तुतिः विष्णुकृता Vishnukrita Shiva Stuti
śivastutiḥ viṣṇukṛtā
Vishnukrita Shiva Stuti (शिवस्तुतिः विष्णुकृता): a hymn of praise (stuti) to Śiva. 37 verses in Sanskrit with Devanagari and IAST.
- Stotra
- Stuti
- Śiva
- Stuti
शिवस्तुतिः विष्णुकृता
1 / 37
विष्णुरुवाच ।प्रसीद भगवन्मह्यमहङ्काररतात्मने ।त्वयि विस्मृतचित्ताय निर्वीर्यायाल्पचक्षुषे ॥ ३०॥
viṣṇuruvāca |prasīda bhagavanmahyamahaṅkāraratātmane |tvayi vismṛtacittāya nirvīryāyālpacakṣuṣe || 30||
प्रसीद जन्ममरणजराशोकोर्मिसङ्कुले ।अगाधे भवसिन्धौ मे पतितस्य महेश्वर ॥ ३१॥
prasīda janmamaraṇajarāśokormisaṅkule |agādhe bhavasindhau me patitasya maheśvara || 31||
रागद्वेषमदक्रोधलोभमोहमहाग्रहैः ।प्रसीद मे गृहीतस्य सर्वसर्वेश्वरामल ॥ ३२॥
rāgadveṣamadakrodhalobhamohamahāgrahaiḥ |prasīda me gṛhītasya sarvasarveśvarāmala || 32||
प्रसीद क्षान्तविक्षेपाक्षिप्तांवाचित्त शङ्कर ।त्र्यक्षाद्य चाक्षिजाताशुशुक्षणिक्षपिताङ्गज ॥ ३३॥
prasīda kṣāntavikṣepākṣiptāṃvācitta śaṅkara |tryakṣādya cākṣijātāśuśukṣaṇikṣapitāṅgaja || 33||
प्रसीद सितसंसिक्तभसितालिप्तविग्रह ।ससिताङ्गासितग्रीव सुसितोक्षगतिप्रिय ॥ ३४॥
prasīda sitasaṃsiktabhasitāliptavigraha |sasitāṅgāsitagrīva susitokṣagatipriya || 34||
प्रसीदाम्बालतालिङ्गिताभीष्टसुरभूरुह ।अम्बाकररुहाग्रात्त लेखाभूषणभूषित ॥ ३५॥
prasīdāmbālatāliṅgitābhīṣṭasurabhūruha |ambākararuhāgrātta lekhābhūṣaṇabhūṣita || 35||
प्रसीद मे महाकाल कालकोमलकन्धर ।आलीजनप्रियालील मायालम्बितविग्रह ॥ ३६॥
prasīda me mahākāla kālakomalakandhara |ālījanapriyālīla māyālambitavigraha || 36||
प्रसीदापिङ्गदीर्घान्तजटाविवृतपश्चिम ।पिङ्गाक्षाक्षर यक्षेष्ट माङ्गल्यालय माधव ॥ ३७॥
prasīdāpiṅgadīrghāntajaṭāvivṛtapaścima |piṅgākṣākṣara yakṣeṣṭa māṅgalyālaya mādhava || 37||
प्रसीदाम्बालोचनाब्जप्रबोधकरभास्कर ।गङ्गाभूषण चन्द्रार्धखण्डमण्डितमस्तक ॥ ३८॥
prasīdāmbālocanābjaprabodhakarabhāskara |gaṅgābhūṣaṇa candrārdhakhaṇḍamaṇḍitamastaka || 38||
प्रसीद योगिध्येयाद्यज्ञानरूपमहेश्वर ।महामहिम मायाविन् महादेव महेश्वर ॥ ३९॥
prasīda yogidhyeyādyajñānarūpamaheśvara |mahāmahima māyāvin mahādeva maheśvara || 39||
नमस्ते कोटिसूर्याभतेजसे भुवनेश्वर ।ब्रह्मादिदेवसङ्गीतपुण्यकीर्ते प्रजार्चित ॥ ४०॥
namaste koṭisūryābhatejase bhuvaneśvara |brahmādidevasaṅgītapuṇyakīrte prajārcita || 40||
तरुणादित्यसङ्काश करुणाकर शङ्कर ।शरणं भव मे भो त्वं मरणार्ति विनाशन ॥ ४१॥
taruṇādityasaṅkāśa karuṇākara śaṅkara |śaraṇaṃ bhava me bho tvaṃ maraṇārti vināśana || 41||
परमेश्वर पद्माक्ष पुरशासन पूरुष ।नमस्ते नाकनाथार्चिताङ्घ्रिपङ्कज केशव ॥ ४२॥
parameśvara padmākṣa puraśāsana pūruṣa |namaste nākanāthārcitāṅghripaṅkaja keśava || 42||
नमो हिरण्यकेशाय शोचिष्केशाय धीमते ।नमस्ते शिपिविष्टाय पृश्निगर्भाय मन्यवे ॥ ४३॥
namo hiraṇyakeśāya śociṣkeśāya dhīmate |namaste śipiviṣṭāya pṛśnigarbhāya manyave || 43||
उमाकुचाग्रसम्मर्दकुङ्कुमारुणवक्षसे ।सुवर्णायादिदेवाय देवगर्भाय वेधसे ॥ ४४॥
umākucāgrasammardakuṅkumāruṇavakṣase |suvarṇāyādidevāya devagarbhāya vedhase || 44||
सुद्युम्नायादिकवये ब्रह्मगर्भाय मन्यवे ।सुशुचे भ्राजसे देव नमस्ते तिग्म रोचिषे ॥ ४५॥
sudyumnāyādikavaye brahmagarbhāya manyave |suśuce bhrājase deva namaste tigma rociṣe || 45||
भूतनाथाय कालाय सृष्टिसंहारकारिणे ।सुवर्त्मने विशुद्धाय कृष्णायामिततेजसे ॥ ४६॥
bhūtanāthāya kālāya sṛṣṭisaṃhārakāriṇe |suvartmane viśuddhāya kṛṣṇāyāmitatejase || 46||
नमः शिवाय रुद्राय नीलकण्ठाय भूयसे ।दिगम्बराय साम्बाय त्र्यम्बकायादिचक्रिणे ॥ ४७॥
namaḥ śivāya rudrāya nīlakaṇṭhāya bhūyase |digambarāya sāmbāya tryambakāyādicakriṇe || 47||
नमो वामाय घोराय सद्याय पुरुषाय च ।ईशानाय च शान्ताय शाश्वतायान्तकारिणे ॥ ४८॥
namo vāmāya ghorāya sadyāya puruṣāya ca |īśānāya ca śāntāya śāśvatāyāntakāriṇe || 48||
भक्तार्तिभेदिने भुक्तिमुक्तिदायादिवेदिने ।वेदवेद्याद्यविद्याय धरामायाविनोदिने ॥ ४९॥
bhaktārtibhedine bhuktimuktidāyādivedine |vedavedyādyavidyāya dharāmāyāvinodine || 49||
माङ्गल्यदायिने नित्यं माङ्गल्याय त्रिशूलिने ।निराशिषे नमस्तुभ्यमाशिषां पतये नमः ॥ ५०॥
māṅgalyadāyine nityaṃ māṅgalyāya triśūline |nirāśiṣe namastubhyamāśiṣāṃ pataye namaḥ || 50||
धर्माय भक्तवर्माय सर्वकर्मैकसाक्षिणे ।नमस्ते नरसिंहारे नरकारे नरेश्वर ॥ ५१॥
dharmāya bhaktavarmāya sarvakarmaikasākṣiṇe |namaste narasiṃhāre narakāre nareśvara || 51||
पञ्चपञ्च कनिष्पञ्च सचराचरपञ्चक ।खेचराचाररहित दुराचारापहारिणे ॥ ५२॥
pañcapañca kaniṣpañca sacarācarapañcaka |khecarācārarahita durācārāpahāriṇe || 52||
सर्वज्ञाय विशिष्टाय सर्वाभिष्टुतकर्मणे ।सर्वसार नमस्तेऽस्तु सर्वेश्वर सदाशिव ॥ ५३॥
sarvajñāya viśiṣṭāya sarvābhiṣṭutakarmaṇe |sarvasāra namaste'stu sarveśvara sadāśiva || 53||
सर्वाधार महायोगिन् योगगम्य पुरुष्टुत ।योगाधार निराधार धराधर नमोऽस्तु ते ॥ ५४॥
sarvādhāra mahāyogin yogagamya puruṣṭuta |yogādhāra nirādhāra dharādhara namo'stu te || 54||
अनाथाय विनाथाय नाथनाथाय शूलिने ।नमोऽस्त्वनाथनाथाय सोमनाथाय शम्भवे ॥ ५५॥
anāthāya vināthāya nāthanāthāya śūline |namo'stvanāthanāthāya somanāthāya śambhave || 55||
नमस्ते ब्रह्मकेशाय विष्णुनेत्राय शोचिषे ।सूर्योदराय रुद्राय रुक्मिणे सोमचेतसे ॥ ५६॥
namaste brahmakeśāya viṣṇunetrāya śociṣe |sūryodarāya rudrāya rukmiṇe somacetase || 56||
सूक्ष्मज्ञानकुठाराय वरेण्यायादिमूर्तये ।नमस्ते भूतचापाय शान्ताय विषयेषवे ॥ ५७॥
sūkṣmajñānakuṭhārāya vareṇyāyādimūrtaye |namaste bhūtacāpāya śāntāya viṣayeṣave || 57||
नमस्ते लोकमालाय ग्रहाकल्पाय मुण्डिने ।नमस्ते दण्ड्यदण्डाय शक्तिशूलकपालिने ॥ ५८॥
namaste lokamālāya grahākalpāya muṇḍine |namaste daṇḍyadaṇḍāya śaktiśūlakapāline || 58||
नमः शेषकलापाय मायाशिष्टाय मायिने ।महेश्वराय महते विश्वनाथाय विष्णवे ॥ ५९॥
namaḥ śeṣakalāpāya māyāśiṣṭāya māyine |maheśvarāya mahate viśvanāthāya viṣṇave || 59||
सर्वार्चिताय शर्वाय सर्वायामृतमूर्तये ।नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सदाशिव ॥ ६०॥
sarvārcitāya śarvāya sarvāyāmṛtamūrtaye |namastubhyaṃ namastubhyaṃ namastubhyaṃ sadāśiva || 60||
यदज्ञानात्कृतं सर्वं क्षमस्व मम शङ्कर ।मा भूदेवमितः पश्चादहङ्कारावृतं मनः ॥ ६१॥
yadajñānātkṛtaṃ sarvaṃ kṣamasva mama śaṅkara |mā bhūdevamitaḥ paścādahaṅkārāvṛtaṃ manaḥ || 61||
त्वत्प्रसादान्महेशान सर्वावस्थासु सर्वदा ।चरणाम्बुजयोस्तेऽस्तु मनो मे जन्मजन्मनि ॥ ६२॥
tvatprasādānmaheśāna sarvāvasthāsu sarvadā |caraṇāmbujayoste'stu mano me janmajanmani || 62||
करुणाकर कारुण्यं कुरु मे शरणार्थिनः ।अणु वानणु वा देव ज्ञानतोऽज्ञानतोऽपि वा ॥ ६३॥
karuṇākara kāruṇyaṃ kuru me śaraṇārthinaḥ |aṇu vānaṇu vā deva jñānato'jñānato'pi vā || 63||
यत्कृतं मनसा वाचा कर्मणा च मया शिव ।भक्तोऽयमिति मामीक्ष्य सुप्रसन्नेन चक्षुषा ।तत्सर्वं मम विश्वेश क्षमस्वोमाहृताहृत ॥ ६४॥
yatkṛtaṃ manasā vācā karmaṇā ca mayā śiva |bhakto'yamiti māmīkṣya suprasannena cakṣuṣā |tatsarvaṃ mama viśveśa kṣamasvomāhṛtāhṛta || 64||
इति स्तुतः स भगवान् विष्णुना प्रभविष्णुना ।आह गम्भीरया वाचा भक्त्या तुष्टो महेश्वरः ॥ ६५॥
iti stutaḥ sa bhagavān viṣṇunā prabhaviṣṇunā |āha gambhīrayā vācā bhaktyā tuṣṭo maheśvaraḥ || 65||
इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहेविष्णुकृतशिवस्तुतिः समाप्ता ।(३०) विष्णु म्हणाला हे परमेश्वरा, तूं मजवर कृपा कर\। मी गर्वानें अतिशय फुगलों त्यामुळे मला तुझी आठवण देखील राहिली नाहीं; माझ्या अंगात कांहीच सामर्थ्य नाहीं\। मी फार क्षुल्लक दृष्टीचा आहें\।(३१) मी संसारसमुद्रांत पडलों आहें ह्या समुद्रांत जन्म, मरण, म्हातारपण दुःख वगैरे लाटा उसळत असून ह्या समुद्राचा अंत लागत नाहीं\। ह्या समुद्रांत मी बुडत आहें तर ह्यांतून तूं कृपा करून मला वर काढ\।(३२) विषयसुख, वैर, अहंकार, राग, आशा आणि अज्ञान ह्या सुसरींनीं मला गिळून टाकिलें आहे, ह्यांपासून माझी मुक्तता कर\। तूं सर्व प्राणिमात्रांचा अधिपति आहेस, तुला शर्व म्हणतात, तुझ्या अंगी कोणताही दोष नाहीं\।(३३) तूं भक्तजनांचे अपराध क्षमा करितोस, परमेश्वरा, तुजवर पार्वतीचें मन फार आसक्त आहे, तुला शंकर म्हणतात, तुला तीन नेत्र आहेत, त्यांपैकी तिसरा कपाळावरील नेत्र सर्वांत श्रेष्ठ आहे\। त्या नेत्रांतील अग्नीनें तूं मदनास जाळून टाकिलेंस, तूं मजवर कृपा कर\।(३४) परमेश्वरा, तूं आपले अंगास पांढरें शुभ्र भस्म लाविले आहेस त्यामुळे तुझे अंग पहिल्यापेक्षा फारच पांढरें दिसतें\। तुझें स्वरूप गोरें असून तुझा गळा नीलरंगाचा आहे, तुला शुभ्र वृषभावर प्रयाण करण्याची फार आवड आहे, तूं मजवर कृपा कर\।(३५) तुझ्या शरीराला पार्वती देवीनें प्रेमानें दोन्ही हातानें आलिंगन दिलें आहे, तूं भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहेस\। पार्वतीच्या हाताच्या नखांचे वण तुझ्या अंगावर उमटले असल्यामुळे ते अलंकार घातल्यासारखे दिसतात, तूं मज्वर कृपा कर\।(३८) परमेश्वरा, तूं मजवर कृपा कर\। परमेश्वरा, पार्वतीच्या नेत्ररूप कमलांस तूं सूर्यासारखा आनंद देतोस, तूं आपले मस्तकावर अलंकारासारखी गंगा धारण केली आहेस, तुझ्या मस्तकावर अर्धचंद्र आहे\।(३९) परमेश्वरा तूं मजवर कृपा कर, योगीश्वर लोक तुझें नेहमीं ध्यान करितात, तूं सर्वं त्रैलोक्याचा मूलपुरुष आहेस, तूं ज्ञानस्वरूप आहेस, तुला महेश्वर असें म्हणतात, तुझी कीर्ति फार मोठी आहे, तुझ्याबरोबर माया असते म्हणून तुला मायी म्हणतात, मायेचें खरें स्वरूप तुला कळून चुकलें आहे, तूं महादेव आहेस, तूं महेश्वर आहेस(४०) एक कोटि सूर्यांच्या तेजासारखें तुझें रूप तेजस्वी आहे, तूं त्रैलोक्याचा अधिपति आहेस, ब्रह्मादिक देव तुझी कीर्ति मोठ्या आवडीनें गातात\। तुझी कीर्ति फार पवित्र आहे, सर्व प्रजा तुझी पूजा करितात\। तुला नमस्कार असो\।(४१) दोन प्रहरच्या वेळच्या सूर्यासारखें तुझें स्वरूप तेजस्वी आहे, तूं मोठा दयाळु आहेस, तूं कल्याण करणारा आहेस\। परमेश्वरा, तूं माझें रक्षण कर\। तूं मरणाचें दुःख नाहींसें करणारा आहेस\।(४२) तुला परमेश्वर म्हणतात, तुझे डोळे कमळांसारखे आहेत, तूं त्रिपुरांस शिक्षा केलीस तूं सर्वांचा मूलपुरुष आहेस, तुझ्या पदकमलांची देवेंद्र देखील पूजा करितो, तुला केशव असेंही म्हणतात, तुला नमस्कार असो\।(४३) तुला हिरण्यकेश (सोन्यासारखे लाल रंगाचे केस असणारा), शोचिष्केश, धीमान्ं, शिपिविष्ट, पृश्निगर्भ अशीं नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो\।(४४) पार्वतीचे स्तनावरील कुंकु लागून तुझा ऊर लाल झाला आहे तुझा वर्ण फार चांगला आहे, तूंच मूलदेव आहेस, तूं सर्व देवाचें मूलस्थान आहेस, तूंच ब्रह्मदेव आहेस तुला नमस्कार असो\।(४५) तुला सुद्युम्न, आदिकवि, ब्रह्मगर्भ, मन्यु, सुशुचा, भ्राजा, देव, तिग्मरोचि अशीं नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो\।(४६) तूं प्राणिमात्रांचा अधिपति आहेस, तुला काल म्हणतात, तूंच जग उत्पन्न करितोस\। आणि तूंच जगाचा संहार करितोस\। तुला सुवर्त्मा, विशुद्ध, कृष्ण आणि अमिततेजा अशीं नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो\।(४७) तुला शिव, रुद्र, नीलकंठ; भूयस्, दिगंबर, सांब, त्र्यंबक, आणि आदिचक्री, अशी नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो\।(४८) तुला वाम, घोर, सद्य, पुरूष, ईशान, शांत, शाश्वत, अनंतकारि अशी अनेक नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो\।(४९) तूं भक्तलोकांची दुःखे दूर करितोस, आणि भक्तांस ह्या लोकीची आणि परलोकीची सुखें (मुक्ति) मिळवून देतोस, तूं मूलज्ञानी आहेस, तू वेदांच्या द्वाराने जाणावयासारखा आहेस, तूंच मूलविद्या आहेस, तूं धरा आणि माया ह्यांची करमणूक करणारा आहेस, तुला नमस्कार असो\।(५०) तूं आपल्या भक्तांचे कल्याण करितोस, तूं नेहमीं कल्याणस्वरूप आहेस, तुझ्या हातांत त्रिशूल आहे, तूं निरिच्छ आहेस, तूं सर्व आशीर्वादांचा अधिपति आहेस तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो\।(५१) तूं धर्मस्वरूप आहेस, तूं भक्तांच्या अंगातील चिलखत आहेस, प्रत्येक प्राणिमात्र जीं जीं बरीं वाईट कामें करितात तीं तीं सर्व तुला माहीत आहेत; तूं नरसिंहाचा शत्रु आहेस, तूं दुर्गतीचा शत्रु आहेस, आणि तूं सर्व मनुष्यांचा राजा आहेस, तुला नमस्कार असो\।(५२) तूं पंचवीस तत्त्वस्वरूप आहेस, तुला पंचमहाभूतांचा संबंध नाहीं, तूं स्थावर जंगम प्राण्यांचा विस्तार करणारा आहेस, आकाशांत फिरणाऱ्या प्राण्यांचे गुणधर्म तुझ्यांत नाहीत, तूं दुराचाराचा नाश करितोस, त्या तुला नमस्कार असो\।(५३) तूं सर्वज्ञ आहेस, तूं सर्वांहून श्रेष्ठ आहेस, सर्व लोक तुझ्या कृत्याची फार प्रशंसा करितात इतकीं तुझीं कृत्यें चांगली आहेत, तू सर्व वस्तूंत सारभूत (महत्वाची) वस्तु आहेस, तूं सर्वांचा अधिपति आहेस, तुला सदाशिव असें म्हणतात, अशा तुला नमस्कार असो\।(५४) तू सर्व प्राणिमात्रांस आधार आहेस, तूं मोठा योगीश्वर आहेस, तुझें स्वरूप योगांच्या साधनानें समजतें, तुला पुरुष्रुत म्हणतात, तूं योगास आधार देणारा आहेस, तुला आधार देणारा दुसरा कोणी नाहीं, तूं पृथ्वीला आधारभूत आहेस, त्या तुला नमस्कार असो\।(५५) तुझा कोणी धनी नाहीं, तुला विनाथ (धनी नसणारा) असें म्हणतात, त्रैलोक्यांत जे मुख्य मुख्य अधिकारी आहेत त्यांचा तूं मुख्य अधिकारी आहेस, तुझ्या हातांत शूल आहे, तूं अनाथ (दीन) लोकांचा अधिपति (रक्षण करणारा) आहेस, तुला सोमनाथ म्हणतात, तुला शंभु म्हणतात त्या तुला नमस्कार असो\।(५६) तुला ब्रह्मकेश, विष्णुनेत्र, शोचिष्, सूर्योदर, रुद्र, रुक्मी, सोमचेताः अशीं नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो\।(५७) तुझी ज्ञानरूप कुन्हाड फार तीक्ष्ण आहे (तूं मोठा ज्ञानी आहेस), तूं सर्वोपेक्षां श्रेष्ठ आहेस, तूं मूलपुरुष आहेस, पंचमहाभूत हे तुझें धनुष्य असून इंद्रियगोचर विषय हे तुझे बाण आहेत; तुझा स्वभाव फार शांत आहे त्या तुला नमस्कार असो\।(५८) हे सात लोक तुझ्या माला आहेत, नऊ ग्रह हे तुझे अलंकार आहेत, तूं आपल्या गळ्यांत मनुष्याच्या मस्तकाच्या माला घालितोस\। तूं अपराधी लोकांस शिक्षा करितोस, शक्ति, शूल आणि कपाल हे तिन्हीही पदार्थ तूं आपल्या हातांत घेतोस, त्या तुला नमस्कार असो\।(५९) तूं आपल्या अंगावर शेषनाग अलंकारा सारखा घेतोस, तूं मायेपेक्षां फार श्रेष्ठ आहेस, तुला मायी म्हणतात, तुला महेश्वर म्हणतात, तूं श्रेष्ठ (मोठा) आहेस, तूं त्रैलोक्याचा अधिपति आहेस, तुला विष्णु म्हणतात, त्या तुला नमस्कार असो\।(६०) सर्व प्राणिमात्र तुझी पूजा करितात, तुला शर्व म्हणतात तर्सेच सर्व असेंही म्हणतात तूं अमृतस्वरूप आहेस; हे सदाशिवा, त्या तुला नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो\।(६१) श्रीशंकरा, माझ्या हातून अज्ञानपणामुळे आजपर्यंत जे कांहीं अपराध झाले असतील, त्या सर्वांची तूं मला क्षमा कर\। आणि आतापासून पुढें केव्हांही माझें मन पुनः गर्विष्ठ होऊं नये, असा वर दे\।(६२) हे महेश्वरा, मी कोणत्याही स्थितींत असो, जन्मोजन्मीं माझें मन तुझ्या कृपादृष्टीनें नेहमीं तुझ्या पदकमलांचीच भक्ति करो, दुसरें कांहीं नको\।(६३) तू मोठा दयाळू मनाचा आहेस, मी तुला शरण आलो आहें, तूं मजवर कृपा हे परमेश्वरा, माझे हातून लहान असो किंवा मोठें असो, समजून असो किंवा नसमजून असो\।(६४) जे कांहीं मनानें वाचेनें आणि कृतीनें बरें वाईट कृत्य झाले असेल त्या सर्वांची हा माझा भक्त आहे अशी कल्पना करून तूं कृपादृष्टीनें मला क्षमा कर\। तूं विश्वाचा अधिपति आहेस, परमेश्वरा, तुला पार्वतीनें वश केलें आहे, आणि वश केलें नाहीं, अशी स्थिति आहे\।(६५) ह्या प्रमाणें जयशील श्री विष्णूनें भगवान् श्री शिवाची स्तुति केल्यावर त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन श्री शंकर त्यास गंभीर शब्दानें म्हणाले(६६) श्रीशिव म्हणाले विष्णो, तुझ्या हातून हजारो हजार अपराध झाले असले तरी तुझ्या भक्तीमुळें आणि तूं केलेल्या माझ्या स्तोत्रामुळे मी आतां तुला ते सर्व क्षमा केले आहेत\।
iti śrīmannīlakaṇṭhanāganāthācāryavaryaviracite śrīmadvīramāheśvarācārasaṅgraheviṣṇukṛtaśivastutiḥ samāptā |(30) viṣṇu mhaṇālā he parameśvarā, tūṃ majavara kṛpā kara\| mī garvāneṃ atiśaya phugaloṃ tyāmuḷe malā tujhī āṭhavaṇa dekhīla rāhilī nāhīṃ; mājhyā aṃgāta kāṃhīca sāmarthya nāhīṃ\| mī phāra kṣullaka dṛṣṭīcā āheṃ\|(31) mī saṃsārasamudrāṃta paḍaloṃ āheṃ hyā samudrāṃta janma, maraṇa, mhātārapaṇa duḥkha vagaire lāṭā usaḷata asūna hyā samudrācā aṃta lāgata nāhīṃ\| hyā samudrāṃta mī buḍata āheṃ tara hyāṃtūna tūṃ kṛpā karūna malā vara kāḍha\|(32) viṣayasukha, vaira, ahaṃkāra, rāga, āśā āṇi ajñāna hyā susarīṃnīṃ malā giḷūna ṭākileṃ āhe, hyāṃpāsūna mājhī muktatā kara\| tūṃ sarva prāṇimātrāṃcā adhipati āhesa, tulā śarva mhaṇatāta, tujhyā aṃgī koṇatāhī doṣa nāhīṃ\|(33) tūṃ bhaktajanāṃce aparādha kṣamā karitosa, parameśvarā, tujavara pārvatīceṃ mana phāra āsakta āhe, tulā śaṃkara mhaṇatāta, tulā tīna netra āheta, tyāṃpaikī tisarā kapāḷāvarīla netra sarvāṃta śreṣṭha āhe\| tyā netrāṃtīla agnīneṃ tūṃ madanāsa jāḷūna ṭākileṃsa, tūṃ majavara kṛpā kara\|(34) parameśvarā, tūṃ āpale aṃgāsa pāṃḍhareṃ śubhra bhasma lāvile āhesa tyāmuḷe tujhe aṃga pahilyāpekṣā phāraca pāṃḍhareṃ disateṃ\| tujheṃ svarūpa goreṃ asūna tujhā gaḷā nīlaraṃgācā āhe, tulā śubhra vṛṣabhāvara prayāṇa karaṇyācī phāra āvaḍa āhe, tūṃ majavara kṛpā kara\|(35) tujhyā śarīrālā pārvatī devīneṃ premāneṃ donhī hātāneṃ āliṃgana dileṃ āhe, tūṃ bhaktāṃce manoratha pūrṇa karaṇārā pratyakṣa kalpavṛkṣa āhesa\| pārvatīcyā hātācyā nakhāṃce vaṇa tujhyā aṃgāvara umaṭale asalyāmuḷe te alaṃkāra ghātalyāsārakhe disatāta, tūṃ majvara kṛpā kara\|(38) parameśvarā, tūṃ majavara kṛpā kara\| parameśvarā, pārvatīcyā netrarūpa kamalāṃsa tūṃ sūryāsārakhā ānaṃda detosa, tūṃ āpale mastakāvara alaṃkārāsārakhī gaṃgā dhāraṇa kelī āhesa, tujhyā mastakāvara ardhacaṃdra āhe\|(39) parameśvarā tūṃ majavara kṛpā kara, yogīśvara loka tujheṃ nehamīṃ dhyāna karitāta, tūṃ sarvaṃ trailokyācā mūlapuruṣa āhesa, tūṃ jñānasvarūpa āhesa, tulā maheśvara aseṃ mhaṇatāta, tujhī kīrti phāra moṭhī āhe, tujhyābarobara māyā asate mhaṇūna tulā māyī mhaṇatāta, māyeceṃ khareṃ svarūpa tulā kaḷūna cukaleṃ āhe, tūṃ mahādeva āhesa, tūṃ maheśvara āhesa(40) eka koṭi sūryāṃcyā tejāsārakheṃ tujheṃ rūpa tejasvī āhe, tūṃ trailokyācā adhipati āhesa, brahmādika deva tujhī kīrti moṭhyā āvaḍīneṃ gātāta\| tujhī kīrti phāra pavitra āhe, sarva prajā tujhī pūjā karitāta\| tulā namaskāra aso\|(41) dona praharacyā veḷacyā sūryāsārakheṃ tujheṃ svarūpa tejasvī āhe, tūṃ moṭhā dayāḷu āhesa, tūṃ kalyāṇa karaṇārā āhesa\| parameśvarā, tūṃ mājheṃ rakṣaṇa kara\| tūṃ maraṇāceṃ duḥkha nāhīṃseṃ karaṇārā āhesa\|(42) tulā parameśvara mhaṇatāta, tujhe ḍoḷe kamaḷāṃsārakhe āheta, tūṃ tripurāṃsa śikṣā kelīsa tūṃ sarvāṃcā mūlapuruṣa āhesa, tujhyā padakamalāṃcī deveṃdra dekhīla pūjā karito, tulā keśava aseṃhī mhaṇatāta, tulā namaskāra aso\|(43) tulā hiraṇyakeśa (sonyāsārakhe lāla raṃgāce kesa asaṇārā), śociṣkeśa, dhīmānṃ, śipiviṣṭa, pṛśnigarbha aśīṃ nāṃveṃ āheta, tyā tulā namaskāra aso\|(44) pārvatīce stanāvarīla kuṃku lāgūna tujhā ūra lāla jhālā āhe tujhā varṇa phāra cāṃgalā āhe, tūṃca mūladeva āhesa, tūṃ sarva devāceṃ mūlasthāna āhesa, tūṃca brahmadeva āhesa tulā namaskāra aso\|(45) tulā sudyumna, ādikavi, brahmagarbha, manyu, suśucā, bhrājā, deva, tigmaroci aśīṃ nāṃveṃ āheta, tyā tulā namaskāra aso\|(46) tūṃ prāṇimātrāṃcā adhipati āhesa, tulā kāla mhaṇatāta, tūṃca jaga utpanna karitosa\| āṇi tūṃca jagācā saṃhāra karitosa\| tulā suvartmā, viśuddha, kṛṣṇa āṇi amitatejā aśīṃ nāṃveṃ āheta, tyā tulā namaskāra aso\|(47) tulā śiva, rudra, nīlakaṃṭha; bhūyas, digaṃbara, sāṃba, tryaṃbaka, āṇi ādicakrī, aśī nāṃveṃ āheta, tyā tulā namaskāra aso\|(48) tulā vāma, ghora, sadya, purūṣa, īśāna, śāṃta, śāśvata, anaṃtakāri aśī aneka nāṃveṃ āheta, tyā tulā namaskāra aso\|(49) tūṃ bhaktalokāṃcī duḥkhe dūra karitosa, āṇi bhaktāṃsa hyā lokīcī āṇi paralokīcī sukheṃ (mukti) miḷavūna detosa, tūṃ mūlajñānī āhesa, tū vedāṃcyā dvārāne jāṇāvayāsārakhā āhesa, tūṃca mūlavidyā āhesa, tūṃ dharā āṇi māyā hyāṃcī karamaṇūka karaṇārā āhesa, tulā namaskāra aso\|(50) tūṃ āpalyā bhaktāṃce kalyāṇa karitosa, tūṃ nehamīṃ kalyāṇasvarūpa āhesa, tujhyā hātāṃta triśūla āhe, tūṃ niriccha āhesa, tūṃ sarva āśīrvādāṃcā adhipati āhesa tulā namaskāra aso, tulā namaskāra aso\|(51) tūṃ dharmasvarūpa āhesa, tūṃ bhaktāṃcyā aṃgātīla cilakhata āhesa, pratyeka prāṇimātra jīṃ jīṃ barīṃ vāīṭa kāmeṃ karitāta tīṃ tīṃ sarva tulā māhīta āheta; tūṃ narasiṃhācā śatru āhesa, tūṃ durgatīcā śatru āhesa, āṇi tūṃ sarva manuṣyāṃcā rājā āhesa, tulā namaskāra aso\|(52) tūṃ paṃcavīsa tattvasvarūpa āhesa, tulā paṃcamahābhūtāṃcā saṃbaṃdha nāhīṃ, tūṃ sthāvara jaṃgama prāṇyāṃcā vistāra karaṇārā āhesa, ākāśāṃta phiraṇāryā prāṇyāṃce guṇadharma tujhyāṃta nāhīta, tūṃ durācārācā nāśa karitosa, tyā tulā namaskāra aso\|(53) tūṃ sarvajña āhesa, tūṃ sarvāṃhūna śreṣṭha āhesa, sarva loka tujhyā kṛtyācī phāra praśaṃsā karitāta itakīṃ tujhīṃ kṛtyeṃ cāṃgalī āheta, tū sarva vastūṃta sārabhūta (mahatvācī) vastu āhesa, tūṃ sarvāṃcā adhipati āhesa, tulā sadāśiva aseṃ mhaṇatāta, aśā tulā namaskāra aso\|(54) tū sarva prāṇimātrāṃsa ādhāra āhesa, tūṃ moṭhā yogīśvara āhesa, tujheṃ svarūpa yogāṃcyā sādhanāneṃ samajateṃ, tulā puruṣruta mhaṇatāta, tūṃ yogāsa ādhāra deṇārā āhesa, tulā ādhāra deṇārā dusarā koṇī nāhīṃ, tūṃ pṛthvīlā ādhārabhūta āhesa, tyā tulā namaskāra aso\|(55) tujhā koṇī dhanī nāhīṃ, tulā vinātha (dhanī nasaṇārā) aseṃ mhaṇatāta, trailokyāṃta je mukhya mukhya adhikārī āheta tyāṃcā tūṃ mukhya adhikārī āhesa, tujhyā hātāṃta śūla āhe, tūṃ anātha (dīna) lokāṃcā adhipati (rakṣaṇa karaṇārā) āhesa, tulā somanātha mhaṇatāta, tulā śaṃbhu mhaṇatāta tyā tulā namaskāra aso\|(56) tulā brahmakeśa, viṣṇunetra, śociṣ, sūryodara, rudra, rukmī, somacetāḥ aśīṃ nāṃveṃ āheta, tyā tulā namaskāra aso\|(57) tujhī jñānarūpa kunhāḍa phāra tīkṣṇa āhe (tūṃ moṭhā jñānī āhesa), tūṃ sarvopekṣāṃ śreṣṭha āhesa, tūṃ mūlapuruṣa āhesa, paṃcamahābhūta he tujheṃ dhanuṣya asūna iṃdriyagocara viṣaya he tujhe bāṇa āheta; tujhā svabhāva phāra śāṃta āhe tyā tulā namaskāra aso\|(58) he sāta loka tujhyā mālā āheta, naū graha he tujhe alaṃkāra āheta, tūṃ āpalyā gaḷyāṃta manuṣyācyā mastakācyā mālā ghālitosa\| tūṃ aparādhī lokāṃsa śikṣā karitosa, śakti, śūla āṇi kapāla he tinhīhī padārtha tūṃ āpalyā hātāṃta ghetosa, tyā tulā namaskāra aso\|(59) tūṃ āpalyā aṃgāvara śeṣanāga alaṃkārā sārakhā ghetosa, tūṃ māyepekṣāṃ phāra śreṣṭha āhesa, tulā māyī mhaṇatāta, tulā maheśvara mhaṇatāta, tūṃ śreṣṭha (moṭhā) āhesa, tūṃ trailokyācā adhipati āhesa, tulā viṣṇu mhaṇatāta, tyā tulā namaskāra aso\|(60) sarva prāṇimātra tujhī pūjā karitāta, tulā śarva mhaṇatāta tarseca sarva aseṃhī mhaṇatāta tūṃ amṛtasvarūpa āhesa; he sadāśivā, tyā tulā namaskāra aso, namaskāra aso, namaskāra aso\|(61) śrīśaṃkarā, mājhyā hātūna ajñānapaṇāmuḷe ājaparyaṃta je kāṃhīṃ aparādha jhāle asatīla, tyā sarvāṃcī tūṃ malā kṣamā kara\| āṇi ātāpāsūna puḍheṃ kevhāṃhī mājheṃ mana punaḥ garviṣṭha hoūṃ naye, asā vara de\|(62) he maheśvarā, mī koṇatyāhī sthitīṃta aso, janmojanmīṃ mājheṃ mana tujhyā kṛpādṛṣṭīneṃ nehamīṃ tujhyā padakamalāṃcīca bhakti karo, dusareṃ kāṃhīṃ nako\|(63) tū moṭhā dayāḷū manācā āhesa, mī tulā śaraṇa ālo āheṃ, tūṃ majavara kṛpā he parameśvarā, mājhe hātūna lahāna aso kiṃvā moṭheṃ aso, samajūna aso kiṃvā nasamajūna aso\|(64) je kāṃhīṃ manāneṃ vāceneṃ āṇi kṛtīneṃ bareṃ vāīṭa kṛtya jhāle asela tyā sarvāṃcī hā mājhā bhakta āhe aśī kalpanā karūna tūṃ kṛpādṛṣṭīneṃ malā kṣamā kara\| tūṃ viśvācā adhipati āhesa, parameśvarā, tulā pārvatīneṃ vaśa keleṃ āhe, āṇi vaśa keleṃ nāhīṃ, aśī sthiti āhe\|(65) hyā pramāṇeṃ jayaśīla śrī viṣṇūneṃ bhagavān śrī śivācī stuti kelyāvara tyācyā bhaktīmuḷe prasanna hoūna śrī śaṃkara tyāsa gaṃbhīra śabdāneṃ mhaṇāle(66) śrīśiva mhaṇāle viṣṇo, tujhyā hātūna hajāro hajāra aparādha jhāle asale tarī tujhyā bhaktīmuḷeṃ āṇi tūṃ kelelyā mājhyā stotrāmuḷe mī ātāṃ tulā te sarva kṣamā kele āheta\|
॥ इति शिवस्तुतिः विष्णुकृता सम्पूर्णम् ॥
Recitation complete
- Meaning
- Grammar
Meanings, sources and related recitations appear here once you finish reading.
Questions
How many verses are in Vishnukrita Shiva Stuti?
Vishnukrita Shiva Stuti has 37 verses on this page, each shown with its number, Devanagari text and transliteration, and meaning where available.
Can I read Vishnukrita Shiva Stuti in Telugu, Kannada or Tamil?
Yes. Use the script buttons at the top of the text (देवनागरी, తెలుగు, ಕನ್ನಡ, தமிழ்) to read the same verses in Telugu, Kannada or Tamil script. Turn on IAST for Roman letters with pronunciation marks. Your choice is remembered on this device.
Is there a PDF of Vishnukrita Shiva Stuti?
You do not need a PDF: this page has the complete text, kept up to date when corrections are made, in every script and with meanings. Tap Save to keep it in your library and open it any time.
